संतोष देशमुख लढा आणि मुंडेंची तब्येत वेगळी…,’ काय म्हणाले सुरेश धस ?
राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर हे प्रकरण लावून धरणारे भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांना 'आका' का 'आका' करीत जेरीस आणले होते. परंतू या आकाला त्यांनी भेट घेत विचारपूस केल्याने खळबळ उडाली आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमध्ये हे प्रकरण लावून धरणारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अडचणीत आणणाऱ्या भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी धनजंय मुंडे यांची भेट घेतल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. या भेटीवेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे हे देखील सोबत होते आणि ही भेट चार तास झाल्याचे बावणकुळे यांनीच जाहीर केल्याने तर आणखीनच प्रश्न निर्माण झाले आहेत. आधी या दोन नेत्यांमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे विस्तव जात नव्हता, परंतू आता भाजपाचे नेते सुरेश धस यांनी थेट मंत्री धनंजय मुंडे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने खळबळ उडाली आहे. भरणे मामा यांनी धनंजय मुंडे यांना रुग्णालयात नेले होते म्हणून मी त्यांची तब्येत कशी आहे याची चौकशी करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जाऊन दोन दिवसांपूर्वी भेट घेतल्याचा दावा भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे. संतोष देशमुख लढा आणि मुंडेंची तब्येत वेगळी अशी सारवा सारव सुरेश धस यांनी केली आहे.