Saroj Patil : आमचा अजित नारळा सारखा… वरून कठीण पण आतून मऊ तर रोहित पवारांबद्दल काय म्हणाल्या सरोज माई?
सरोज पाटील माई यांनी अजित पवार आणि रोहित पवार यांना कौतुकाची थाप दिली. सांगलीतील इस्लामपूर येथे बोलत असतांना त्यांनी दोघांचे तोंडभरून कौतुक केले
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन.डी. पाटील विधी महाविद्यालय, श्रीमती सरोज नारायण पाटील (माई) मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्रा. डॉ. एन. डी. पाटील बहुउद्देशीय सभागृहाचा उद्घाटन सोहळा व प्रारंभोत्सव कार्यक्रम आज दिग्गजांच्या उपस्थितीत झाला. यावेळी शरद पवार यांच्या बहीण आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आत्या सरोज पाटील माई यांनी केलेलं भाषण चांगंलच गाजलं.
सरोज पाटील माई यांनी आपल्या भाषणात अजित पवार आणि रोहित पवार यांचं तोंडभरून कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार यांच्याबद्दल बोलताना सरोज माई पाटील म्हणाल्या, अजितदादा वरून आक्रमक दिसत असला तरी आतून गोड आहे. वरून कठीण दिसत असला तरी आतून तो नारळासारखा आहे. ज्या ज्या वेळी आमच्या घरावर संकट आलं त्यावेळी अजित धावून आल्याचे त्यांनी म्हटले तर रोहित पवारांचं कौतुक करताना त्या म्हणाल्या, उगवता तारा म्हणजे रोहित पाटील.. आमचा लाडका रोहित पवार आता चांगलाच धीट झालाय. चांगल्या पद्धतीने भाषण देऊ लागलाय..
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

