Satara Doctor Death : सातारा डॉक्टर महिला मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट, आरोपी गोपाल बदने…
फलटणमधील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. संशयित आरोपी गोपाल बदनेची पोलीस कोठडीतच खात्यांतर्गत चौकशी सुरू आहे. या चौकशीतून प्रकरणातील सत्य समोर येण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.
सातारा जिल्ह्यातील फलटण येथे घडलेल्या डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणात एक महत्त्वाची अद्ययावत माहिती समोर आली आहे. या प्रकरणात संशयित म्हणून अटकेत असलेल्या गोपाल बदने याची पोलीस कोठडीतच खात्यांतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे. ही चौकशी पारदर्शक आणि निष्पक्षपणे पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ती पाऊले उचलली आहेत.
या गंभीर प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांची विशेष चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ही चौकशी प्रक्रिया पूर्ण केली जाईल. फलटण मधील डॉक्टर महिलेच्या आत्महत्येमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. मरण्यापूरवी तिने हातावर सुसाईड नोट लिहून पोलीस गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांची नावं लिहून अनेक आरोप केले होते. या प्रकरणाच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गोपाल बदने याची खात्यांतर्गत सुरू असलेली चौकशी, डॉक्टर महिलेच्या आत्महत्येमागील नेमके कारण आणि या प्रकरणात त्याचा संभाव्य सहभाग याबाबत अधिक माहिती उघड करण्यास मदत करेल अशी अपेक्षा आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

