अतिउत्साही कार्यकर्त्यांची करामत, निकालापूर्वीच शशिंकात शिंदेंच्या विजयाचे झळकवले बॅनर
सातारा खंडाळा येथील शशीकांत शिंदे यांच्या लोकसभेच्या विजयाचे सकाळी लावलेले बॅनर त्यांच्याच कार्यकर्त्यांनी हटवले आहेत. मात्र सायंकाळी शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो यासाठी बॅनर हटवल्याची माहिती मिळतेय.
लोकसभा निकालापूर्वीच सातारा खंडाळा येथे लोकसभा उमेदवार शशीकांत शिंदे यांच्या विजयाचे बॅनर झळकलेले पाहायला मिळाले. सातारा खंडाळा येथील शशीकांत शिंदे यांच्या लोकसभेच्या विजयाचे सकाळी लावलेले बॅनर त्यांच्याच कार्यकर्त्यांनी हटवले आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, यासाठी कार्यकर्त्यांनी सकाळी लावलेले बॅनर हटवले असल्याचे समजते आहे. सातारा लोकसभा निवडणुकीसाठी अतिशय चुरशीची लढत झाली. महायुतीचे उदयनराजे भोसले विरुद्ध महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे यांच्यामध्ये काट्याची टक्कर झाली आहे. मतदानानंतर लोकांमध्ये सातारा लोकसभेमधून कोण जिंकणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात असतानाच खंडाळा तालुक्यात शशिकांत शिंदे यांच्या विजयाचे बॅनर निकालापूर्वीच झळकल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महामार्ग लगतच हे बॅनर लागल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले जात होते. दिवसभर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात याची चर्चा सुरू होती. मात्र सायंकाळी शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो यासाठी बॅनर हटवल्याची माहिती मिळतेय.
Published on: May 26, 2024 05:36 PM
नुसती धावपळ...धुराचा कल्लोळ...आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग!
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
