रवी राणा लोचटपणे… ‘त्या’ दाव्यानंतर विजय वडेट्टीवार यांची जिव्हारी लागणारी टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यावर 15 दिवसात उद्धव ठाकरे हे सरकारमध्ये दिसतील, असा मोठा दावा रवी राणा यांनी केला होता. यावर काँग्रेसचे बडे नेते विजय वडेट्टीवार यांनी पलटवार केला आहे. यावेळी काँग्रेसचे बडे नेते विजय वडेट्टीवार यांनी रवी राणा यांच्यावर बोलताना जिव्हारी लागणारी टीका केली.
रवी राणा यांना काय स्थान आहे? असा सवाल करत काँग्रेसचे बडे नेते विजय वडेट्टीवार यांनी अमरावतीचे आमदार रवी राणा यांच्यावर सडकून टीका केली आहे. तर रवी राणा हे लोचटपणे भाजपच्या मागे पळतात, वारंवार स्वतःचे निर्णय बदलणाऱ्या माणसाला किती महत्त्व द्यायचं, असं वक्तव्य करत विजय वडेट्टीवार यांनी आमदार रवी राणा यांच्यावर बोलताना जिव्हारी लागणारी टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यावर 15 दिवसात उद्धव ठाकरे हे सरकारमध्ये दिसतील, असा मोठा दावा अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी केला होता. तर येणारा काळ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा असणार आहे. देशाचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच गरजेचे आहेत. हे उद्धव ठाकरे यांना माहिती आहे, असे खोचक वक्तव्यही रवी राणा यांनी केले होतं. यावरच विजय वडेट्टीवार यांनी पलटवार करत रवी राणा यांच्यावर निशाणा साधला आहे.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप

