हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगरपालिकेला मागील 10 महिन्यांपासून शासनाकडून निधी मिळत नसल्याने नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांनी तीव्र आंदोलन सुरू केले आहे. निवडणुकीला 10 महिने उलटूनही एक पैसाही निधी मिळाला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती आणि इतर विकासकामांसाठी 15 कोटी रुपयांचा प्रस्ताव प्रशासनाकडे प्रलंबित आहे, मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

इतर चार नगरपालिकांना कोट्यवधींचा निधी मिळत असताना, शहाद्याला मात्र शून्य निधी मिळाल्याचे जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी सांगितल्याने पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. निधी मिळत नसल्यास शहादा शहराला धुळे जिल्हा, गुजरात किंवा मध्य प्रदेशात स्थलांतरित करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच, नागरिकांना सुविधा मिळत नसतील, तर त्यांनी कर का भरावा, असा प्रश्न उपस्थित करत लवकरच नगरपालिका बंद पाडण्याचा आणि आमरण उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला आहे. पालकमंत्री, स्थानिक आमदार आणि प्रशासकीय अधिकारी निधी अडवत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.