Shahaji Bapu Patil Video : ‘शरद पवार राजकारण या विद्यापीठाचे कुलगुरू तर राऊत त्याच अंगणवाडीत खेळणारा वात्रट…’, शहाजीबापूंची खोचक टीका
आम्ही गुहाटीला गेलो त्याच वेळेस उद्धव ठाकरेंचं भविष्य संपलेले होते त्यांना संधी दिली होती मात्र त्यांनी आपण निष्क्रिय आहोत हेच महाराष्ट्राला दाखवून दिलं असं म्हणत उद्धव ठाकरेंवर शहाजी बापू पाटील यांनी निशाणा साधला.
संजय राऊत म्हणजे सकाळचा वाजणारा भोंगा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात निर्लज्जम सदासुखी ही व्याख्या फक्त संजय राऊत यालाच शोभते, असे म्हणत शिंदेंचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. शरद पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक चांगलं उदाहरण म्हणून याकडे पाहणे गरजेचे होते दुर्दैवानं संजय राऊत यांनी या कार्यक्रमाकडे अतिशय खालच्या नजरेने पाहिले. पवार हे राजकारण या विद्यापीठाचे कुलगुरू आहेत तर संजय राऊत हा राजकारणातील अंगणवाडीत खेळणारा वात्रट पोरगा आहे, अशी जहरी टीका शहाजी बापू पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर केली. राजन साळवी यांच्या प्रवेशावर बोलताना शहाजीबापू पाटील असंही म्हणाले, खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहे हे निवडणुकीनंतर राजन साळवी यांना समजले म्हणून त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश करायचा निर्णय घेतला. येत्या सहा महिन्यात उबाठा गटामध्ये कोणीच शिल्लक राहणार नाही टप्प्याटप्प्याने सगळेच खऱ्या शिवसेनेत प्रवेश करतील उद्धव ठाकरे संजय राऊतच्या नादाला लागल्यामुळे भविष्याचे एकाकी पडतील, असंही शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात

