पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्यासह ‘ही’ वारसा स्थळं दत्तक दिली जाणार

Harshada Shinkar | Updated on: Aug 14, 2024 | 2:24 PM

पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाडा आता दत्तक देण्यात येणार असल्याची बातमी समोर येत आहे. ऐतिहासिक वारसा स्थळांसाठी केंद्रीय पुरातत्व विभागाने एक नवी योजना आणली आहे. ऐतिहासिक वारसा स्थळांसाठी सुरू करण्यात आलेली नेमकी काय आहे ती योजना आणि त्याचा हेतू काय?

पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाडा आता दत्तक देण्यात येणार आहे. केंद्रीय पुरातत्व खात्याकडून ऐतिहासिक वारसा स्थळांसाठीची नवी योजना जाहीर करण्यात आली आहे. या नव्या योजनेनुसार पुणे शहरासह पुणे जिल्ह्यातील एकूण पाच ऐतिहासिक वारसा स्थळ आता दत्तक घेता येणार आहे. पुरातत्व स्थळांच्या संवर्धनासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाकडून ही नवी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे नाव “ऍडॉप्ट अ हेरिटेज” योजना असे आहे. वारसा स्थळांची नियमित देखभाल तसेच संवर्धन आणि व्यवस्थापनासाठी वारसा स्थळे संस्थेला दत्तक देण्याची केंद्राची ही नवी योजना असणार आहे. पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा स्थळांमध्ये शनिवारवाडा, आगाखान पॅलेस, पाताळेश्वर लेणी, लोहगड, कार्ला लेणी आणि भाजे लेणी यांचा समावेळ असणार आहे. बघा यासंदर्भातील व्हिडीओ

Published on: Aug 14, 2024 2:24 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us