“नितेश राणे गणपती मंडळाचा सदस्य तरी होईल का?” ठाकरे गटाकडून सडकून टीका
नागपूरमध्ये रामटेक जवळ ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे राज्याचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे फलक युवा सेनेतर्फे लावण्यात आले होते. यावर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी टीका केली होता. नितेश राणे यांच्या टीकेला ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
सोलापूर : नागपूरमध्ये रामटेक जवळ ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे राज्याचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे फलक युवा सेनेतर्फे लावण्यात आले होते. यावर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी टीका केली होता. नितेश राणे यांच्या टीकेला ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “आदित्य ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागल्यावर नितेश राणे यांच्या पोटात आग का पडली? नितेश राणे तुम्ही बोलता ते बरोबर आहे, की आदित्य ठाकरे सरपंच होण्याच्या योग्यतेचे नाहीत, कारण आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान होतील. मात्र नितेश राणे हे कोकणातील एकाद्या गणपती मंडळाचे सदस्य होण्याच्याही लायकीचे नाहीस. कोकणवासियांना माहिती आहे की, तुम्ही गद्दार, बिकाऊ आहात. संपूर्ण मंडळ देखील विकून खाल, म्हणून तुम्ही ते सदस्य देखील व्हायच्या लायकीचे नाही”.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

