Sharad Pawar Health Update | शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनीच केला मोठा खुलासा, म्हणाले....
sharad pawar

Sharad Pawar Health Update | शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनीच केला मोठा खुलासा, म्हणाले….

| Updated on: Feb 22, 2026 | 11:20 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्येत पुन्हा थोडी बिघडली आहे. त्यांना उपचारासाठी रुबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांनी सांगितले की, पुढील दोन दिवस ते रुग्णालयात राहतील. त्यांना उलट्या होत होत्या, त्यामुळे त्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) झाली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्येत पुन्हा थोडी बिघडली आहे. त्यांना उपचारासाठी रुबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांनी सांगितले की, पुढील दोन दिवस ते रुग्णालयात राहतील. त्यांना उलट्या होत होत्या, त्यामुळे त्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) झाली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना सलाईन लावण्यात आले आहे. रक्त तपासणी आणि सिटीस्कॅनही करण्यात आले असून सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आले आहेत. डॉक्टरांनी सांगितले की, त्यांना थोडा खोकलाही होता, पण काळजी करण्यासारखे काही नाही. दोन दिवसांत ते घरी परततील. ते व्यवस्थित बोलत आहेत. त्यांच्या कुटुंबीयांपैकी सुप्रिया सुळे आणि इतर सदस्य रुग्णालयात उपस्थित आहेत. सध्या त्यांची तब्येत ठीक असून घाबरण्याची गरज नाही.

Published on: Feb 22, 2026 11:20 AM