Sharad Pawar Health Update | शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा, 48 तासांनी डिस्जार्च मिळणार, डॉक्टरांची महिती
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना काल पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. शरद पवार यांना उलट्यांचा त्रास आणि डिहायड्रेशन झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्यावर सातत्याने लक्ष ठेवले जात असून, पुढील 48 तासांत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना काल पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. शरद पवार यांना उलट्यांचा त्रास आणि डिहायड्रेशन झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्यावर सातत्याने लक्ष ठेवले जात असून, पुढील 48 तासांत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, “पवार साहेबांची तब्बेत आता एकदम चांगली आहे. त्यांनी चांगला आराम केला आहे आणि परवा ते घरी जाणार आहेत. ते पुढचे काही दिवस पुण्यात राहणार आहेत आणि त्यानंतर मुंबईला परत जाणार आहेत. पुढील दोन दिवस त्यांना आराम करावा लागणार आहे. ते व्यवस्थित खात आहेत, चांगला नाश्ता करत आहेत आणि सर्व काही ठिक आहे. त्यांचे सर्व रिपोर्ट्स चांगले आले आहेत. सगळी तपासणी पूर्ण झाली असून सर्व काही स्थिर आहे, कोणतीही काळजी करण्याची गरज नाही.” राजकीय वर्तुळात शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात होती, मात्र आता डॉक्टरांच्या अपडेटनंतर त्यांच्या तब्बेतीबाबत दिलासा मिळाला आहे.
