कुणी म्हणाले की बाल साहित्य वाचत नाही, काय म्हणाले शरद पवार ?
खासदार संजय राऊत यांच्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकाचे प्रकाशन आज मुंबईत झाले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून भाषण करताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ईडीचा कसा गैरवापर होतो याचा पाढा वाचला.
शरद पवार आपल्या भाषणात म्हणाले की अनिल देशमुखांवर १०० कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप केला. कोर्टात केस केली. त्यातला शंभरचा आकडा गेला. दोन शून्य गेली. अखेर एक कोटीचा आरोप केला. आरोप करणारे अधिकारी असे होते की त्यांच्यावर सरकारने कारवाई केली होती. त्यांनी राग मनात धरला होता असे पवार यांनी शेवटी सांगितले. ते पुढे म्हणाले की मला एका गोष्टीची गंमत वाटते यासर्व मंडळींना त्रास होत होता. पण नमली नाहीत. एकत्र राहिली. एकमेकांना धीर देत राहिली. संकटातून बाहेर कसे निघतील याची काळजी घेत राहीली. हे पुस्तक प्रसिद्ध होणार आहे हे दोन दिवस प्रसारमाध्यमातून मी वाचत आहे. टीव्हीवर पाहतो आहे. मला आश्चर्य वाटतं. सत्ताधारी पक्षाच्या लोकांना पुस्तक न वाचता कसं समजलं हे माहीत नाही. प्रचंड टीका. त्या पुस्तकावर वाद सुरू आहे. कुणी सांगितलं मी बालसाहित्य वाचत नाही. कुणी आणखी काही सांगितलं. मी हे जे पुस्तक लिहिलं. त्यातून जी माहिती येते ती पाहिल्यावर एकंदर सत्तेचा गैरवापर कसा होतो याचं उत्तम लिखाण या पुस्तकाच्या माध्यमातून जनतेसमोर आलं असेही शरद पवार यावेळी म्हणाले.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक

