शरद पवार दिल्लीत दाखल, महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे नेमकं काय घडतंय? चर्चांना उधाण

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज दिल्लीत दाखल झाले आहेत (Sharad Pawar Delhi Visit)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज दिल्लीत दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर आता शरद पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. शरद पवार यांच्या अचानक या दिल्लीवारीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे शरद पवार शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच दिल्लीत दाखल झाले आहेत. ते दुपारच्या विमानाने दिल्लीत दाखल झाले. शरद पवार यांच्या दिल्ली दौऱ्यावर महाराष्ट्रातील सर्व प्रमुख राजकीय नेत्यांचं लक्ष असेल. पवार यांची केरळमधील काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांसोबतची भेट होणार होती. ही भेट नियोजित होती, असं म्हटलं जात आहे. पण या दौऱ्यादरम्यान पवार आणखी कुणाची भेट घेणार का? याबाबत उत्सुकता आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ही घडामोडी आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय. (Sharad Pawar Delhi Visit)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI