माझी बायको म्हणेल तुला खायलाही नाही अन् जेवणही नाही; ‘त्या’ चर्चांवर बजरंग सोनवणे यांचं अफलातून उत्तर

मला पदरात घ्या, असं बजरंग सोनवणे अजित पवारांना म्हणाले असतील, असा मोठा दावा अमोल मिटकरी यांनी केलाय. अमोल मिटकरी यांनी याबाबत ट्विट केलं आहे. यानंतर मिटकरी यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला याबाबत प्रतिक्रिया दिली होती. यावर आज बजरंग सोनवणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बघा व्हिडीओ

माझी बायको म्हणेल तुला खायलाही नाही अन् जेवणही नाही; 'त्या' चर्चांवर बजरंग सोनवणे यांचं अफलातून उत्तर
| Updated on: Jun 12, 2024 | 4:05 PM

बीडचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला. मला पदरात घ्या, असं बजरंग सोनवणे अजित पवारांना म्हणाले असतील, असा मोठा दावा अमोल मिटकरी यांनी केलाय. अमोल मिटकरी यांनी याबाबत ट्विट केलं आहे. यानंतर मिटकरी यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला याबाबत प्रतिक्रिया दिली होती. यावेळी ते म्हणाले, बजरंग सोनवणे हे अजित पवार यांच्याकडे आपल्याला पुन्हा आपल्या गटात घ्यावं, अशी विनंती करत असावेत. शरद पवार गटात आपलं भविष्य उज्ज्वल नाही. त्यामुळे त्यांनी अजित पवार गटात घेण्यासाठी विनंती केली असेल, असा दावा त्यांनी केला. तर यावर आज बजरंग सोनवणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अमोल मिटकरी हे अजित दादांच्या बंगल्यावरील ऑपरेटर आहेत का? कोण आहेत अमोल मिटकरी? असा सवाल बजरंग सोनवणे यांनी केला. कारण ऑपरेटर कडेच फोनचे रेकॉर्ड असते, असा खोचक टोला त्यांनी लगावला. पुढे ते असेही म्हणाले, माझ्या बीड जिल्ह्यातील जनतेने खूप प्रेम केले आहे. माझ्या मनात जर काही पाप असेल तर मी घराच्या बाहेर पडताच जिल्ह्यातील जनता माझं तोंड चपलाने फोडेल. पवार साहेबांना सोडायचं म्हंटल्यावर माझे वडील मला कानशिलात मरतील. माझी बायको म्हणेल तुला खायला पण नाही, नाश्ता देखील नाही, अशी परिस्थिती होईल, अशी प्रतिक्रिया सोनवणे यांनी दिली.

Follow us
तूच नादाला लागू नको... प्रसाद लाड यांच्यानंतर जरांगेंचा कोणाला इशारा?
तूच नादाला लागू नको... प्रसाद लाड यांच्यानंतर जरांगेंचा कोणाला इशारा?.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पवारांना दिलासा, आयोगाकडून मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पवारांना दिलासा, आयोगाकडून मोठा निर्णय.
एकदम जवळून बघा वाघनखं...'tv9 मराठी' वर पहिली झलक, जाणून घ्या वैशिष्ट्य
एकदम जवळून बघा वाघनखं...'tv9 मराठी' वर पहिली झलक, जाणून घ्या वैशिष्ट्य.
'मराठी बोलणार नाही, काय करायचे ते...', व्यावसायिकाला मनसे स्टाईल दणका
'मराठी बोलणार नाही, काय करायचे ते...', व्यावसायिकाला मनसे स्टाईल दणका.
‘लाडकी बहीण, लाडका भाऊ झाले असेल तर लाडक्या नातवांचे पण तेवढे बघा’
‘लाडकी बहीण, लाडका भाऊ झाले असेल तर लाडक्या नातवांचे पण तेवढे बघा’.
कोकणातील 'या' दोन मेडिकल कॉलेजला लाखोंचा दंड, कारण नेमकं काय?
कोकणातील 'या' दोन मेडिकल कॉलेजला लाखोंचा दंड, कारण नेमकं काय?.
शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी, शिवकालीन वाघनखं साताऱ्यात; बघा पहिली झलक
शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी, शिवकालीन वाघनखं साताऱ्यात; बघा पहिली झलक.
जगभरात मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर ठप्प, 'या' क्षेत्राला बसला मोठा फटका
जगभरात मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर ठप्प, 'या' क्षेत्राला बसला मोठा फटका.
संभाजीनगरात लाडक्या बहिणी त्रस्त, अर्ज भरण्यास आलेल्या महिलांचा खोळंबा
संभाजीनगरात लाडक्या बहिणी त्रस्त, अर्ज भरण्यास आलेल्या महिलांचा खोळंबा.
महायुतीचे काळे कारनामे..., पवार गटाचं निदर्शन, काळे फुगे लावून डिवचलं
महायुतीचे काळे कारनामे..., पवार गटाचं निदर्शन, काळे फुगे लावून डिवचलं.