Sharad Pawar Health Update | शरद पवार यांना रुग्णालयातून उद्या डिस्चार्ज; तब्येतीबाबत नेमकं काय म्हणाले डॉक्टर?

Sharad Pawar Health Update | शरद पवार यांना रुग्णालयातून उद्या डिस्चार्ज; तब्येतीबाबत नेमकं काय म्हणाले डॉक्टर?

| Updated on: Feb 24, 2026 | 12:56 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. शरद पवार यांना उलट्या आणि डिहायड्रेशनमुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले गेले होते.

डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे की, त्यांच्यावर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे आणि उद्या दुपारपर्यंत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, “पवार साहेबांची तब्बेत आता एकदम चांगली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका. आनंदाची बातमी अशी की उद्या पवार साहेबांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. तसेच दोन ते तीन दिवसांनी ते ट्रॅव्हलही करू शकतात,” असे डॉक्टरांनी सांगितले.

Published on: Feb 24, 2026 12:56 PM