महाराष्ट्र थोडाफार मला ओळखतो, पण… कारण नसताना माझं नाव का घेतलं?; शरद पवारांचा राज ठाकरेंना सवाल
अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठवाडा दौऱ्यावर असताना शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. मनोज जरांगे यांच्या आडून उद्धव ठाकरे आणि शरद पवार राज्यातील वातावरण दूषित करत असल्याचा राज ठाकरे यांनी आरोप केला होता. यावरच आज शरद पवार यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय
“राज ठाकरे यांनी दोन तीनदा माझं नाव का घेतलं. मला कळलेलं नाही. मी या रस्त्याने जात नाही. मला महाराष्ट्र थोडासा ओळखतो. माझी पार्श्वभूमी अशी नाही. आग्रह केला नाही आणि करणार नाही.त्यांनी कारण नसताना माझं नाव घेतलं. मीही मराठवाड्यात फिरतो. मलाही लोकांनी अडवलं होतं. मला निवेदन दिलं. हे पवारच करतात का? मला निवेदन द्या… मला आडवा…” असा प्रश्न शरद पवारांनी उपस्थित करत राज ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी मराठवाडा दौऱ्यावर असताना राज ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. शरद पवारांसारखा महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती आहे. त्यांनी पुढे येऊन हे सगळे थांबवले पाहिजे तर तेच म्हणतात, महाराष्ट्राचा मणिपूर होईल. शरद पवारांनी भूमिका घेतली पाहिजे तर तेच हातभार लावत आहे. शरद पवारांचे राजकारण हे जातीमध्ये द्वेष पसरून करणे हेच आहे, असे म्हणत राज ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावरच आता शरद पवारांनी भाष्य केले आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

