झोप उडाली अन् आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
माजी खासदार संभाजी राजे, राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनी राज्यात नवीन आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीचा राज्यातील महाविकास आघाडीला मोठा फटका बसणार असल्याची चर्चा केली जात आहे. या तिसऱ्या आघाडीने विधानसभेच्या सर्वच्या सर्व जागा लढवण्याची तयारी सुरू केली आहे. यावरूनच शरद पवार यांनी भाष्य केले आहे.
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. प्रत्येक नेत्यानं आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशातच माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादीचे शरद पवार हे प्रत्येक जिल्ह्यात जाऊन पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे. आज शरद पवार सांगलीच्या दौऱ्यावर आहे. सांगली दौऱ्याच्यावेळी त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तिसऱ्या आघाडीसंदर्भात एक मिश्कील वक्तव्य केले आहे. राज्यात नवीन आघाडी तयार झाली आहे. त्याचा तुम्हाला फटका बसणार का? असा सवाल माध्यमाच्या प्रतिनिधीने विचारला असता शरद पवार म्हणाले, केव्हाही हे लोक एकत्र आल्यावर परिणाम होणारच आहे. तर आमची झोप उडाली आहे. आम्ही भयंकर अस्वस्थ आहोत. आता काय आपलं होणार?, असं मिश्कील वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.
Latest Videos
Latest News