Sharad Pawar : फडणवीसांना माणसं आपलीशी करण्यात यश, शरद पवारांचा टोला
राज्यसभा निवडणुकीच्या निकालावरुन आता राज्यात प्रचंड राजकारण तापलंय. यावर दिवसभर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
मुंबई: राज्यसभा निवडणुकीच्या निकालाची प्रक्रिया पहाटेपर्यंत चालू होती. याचा निकाल मध्यरात्री 3 वाजता लागला. राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) राजकीय पक्षांनी आरोप-प्रत्यारोप टीका टिप्पणी सुरू होती. यामध्ये अनेकवेळा घेडेबाजारचाही आरोप झालाय. यानंतर अखेर आज पहाटे राज्यसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये शिवसेनेचे संजय पवार पराभूत झाले. यानंतर एकीकडे भाजनं (BJP) जल्लोष केला तर दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे टीका करताना दिसले. भाजपच्या या रात्रीस खेळ चालेच्या राजकारणावर आघाडीच्या (maha vikas aghadi) नेत्यांनी जोरदार टीका केली. फडणवीसांना माणसं आपलीशी करण्यात यश आल्याचा टोला शरद पवार यांनी फडणवीसांना लगावलाय. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यावेळी चांगलीच टीका केली.
Published on: Jun 11, 2022 11:33 AM
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी

