AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Koregaon Bhima Case: कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी शरद पवार आज साक्ष नोंदवणार! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Koregaon Bhima Case: कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी शरद पवार आज साक्ष नोंदवणार! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

| Edited By: | Updated on: May 05, 2022 | 11:22 AM
Share

1 जानेवारी 2018 रोजी पुण्यातील भीमा कोरेगाव येथे हिंसाचार झाला होता. त्यात एकाचा मृत्यू झाला होता तर दहा पोलिसांसह अनेक जण जखमी झाले होते.

मुंबई : राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pwar on Koregaon Bhima) यांची साक्ष आज नोंदवली जाणार आहे. कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी शरद पवार यांची साक्ष आज मुंबईत नोंदवली जाईल. कोरेगाव भीमा हिंसाचार (Koregaon Bhima Case) प्रकरणी याआधीही शरद पवारांना साक्ष (Statement) नोंदवण्यासाठी समन्स देण्यात आलेलं होतं. आज शरद पवार साक्ष नोंदवायला जाण्याआधी त्यांना देण्यात आलेलं समन्स हे आतापर्यंतचं तिसरं समन्स होतं. याआधी 23 आणि 24 फेब्रुवारीला शरद पवार आपली साक्ष नोंदवण्यासाठी आयोगापुढे हजर राहण्याची शक्यता होती. मात्र काही परिहार्य कारणास्तव समोर हजर राहू शकले नव्हते. दरम्यान, आज शरद पवार साक्ष नोंदवण्यासाठी हजर राहणार असून त्यासाठी ते सकाळी मुंबईच्या सिल्वर ओक बंगल्यावरुन रवानाही झाले.

Published on: May 05, 2022 11:21 AM