शिंदे गट की शिवसेना? दसरा मेळावा कोणाचा?; शरद पवार म्हणतात एकनाथ शिंदेंनाही अधिकार पण…
सध्या दसरा मेळाव्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. दसरा मेळावा घेण्यावरून शिवसेना आणि शिंदे गट आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे. यावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : सध्या दसरा मेळाव्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. दसरा मेळावा घेण्यावरून शिवसेना (Shiv Sena) आणि शिंदे गट आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे. शिवसेना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी आग्रही आहे. दुसरीकडे शिंदे गटाकडून देखील दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचीच मागणी करण्यात आली होती. मात्र अद्यापही दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कोणाला मिळणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे. आता या वादावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपलं रोखठोख मत मांडलं आहे. एकनाथ शिंदेंनाही (Eknath Shinde) दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आहे. त्यासाठी त्यांना बीकेसीचं मैदान देण्यात आलं आहे. मात्र शिवाजी पार्क म्हटलं की शिवसेनाच असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं आहे.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?

