Shivshankar Patil Passed Away | शेगावचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकर पाटील यांचं निधन

कोरोनाचे निर्बंध असल्यामुळे त्यांच्या अंत्यविधीसाठी मोजक्याच भक्तांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी शेगाव येथे कोणीही गर्दी करु नये, असे आवाहन शेगाव संस्थांच्या (Shegaon Sansthan) वतीने सांगण्यात आले आहे.

बुलडाणा : शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील (Shivshankar Bhau Patil) यांचे दुखद निधन झाले आहे. ते 82 वर्षांचे होते. कोरोनाचे निर्बंध असल्यामुळे त्यांच्या अंत्यविधीसाठी मोजक्याच भक्तांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी शेगाव येथे कोणीही गर्दी करु नये, असे आवाहन शेगाव संस्थांच्या (Shegaon Sansthan) वतीने सांगण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI