आमरण उपोषण…उपचारास नकार अन् बोलताना त्रास तरीही मनोज जरांगे पाटील सगेसोयऱ्यांच्या कायद्यावर ठाम
मराठा आरक्षणासाठी सरकार १६ फेब्रुवारीली विशेष अधिवेशन बोलवण्याची शक्यता आहे. मागास वर्ग आयोगाचा अहवाल अंतिम टप्प्यात असून तो स्वीकारून कायदा करण्यासाठी सरकार विशेष अधिवशेन घेण्याच्या तयारीत असल्याचे म्हटलं जातंय.
मुंबई, १३ फेब्रुवारी २०२४ : जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे. तर दुसरीकडे विशेष अधिवेशन बोलवून स्वतंत्र आरक्षण देण्याची तयारी केल्याची माहिती मिळतेय. मात्र जरांगे पाटील सगेसोयरेच्या अधिसूचनेवरून कायद्याच्या मागणीवर ठाम आहेत. गेल्या तीन दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आमरण उपोषणावर बसलेत. तर मराठा आरक्षणासाठी सरकार १६ फेब्रुवारीली विशेष अधिवेशन बोलवण्याची शक्यता आहे. मागास वर्ग आयोगाचा अहवाल अंतिम टप्प्यात असून तो स्वीकारून कायदा करण्यासाठी सरकार विशेष अधिवशेन घेण्याच्या तयारीत आहे. अर्थात मनोज जरांगे पाटील यांची मागणी सगसोयऱ्यांची जी अधिसूचना काढली त्यावरून कायदा करण्याची आहे. पण सरकार वेगळा आरक्षणाचा कायदा करू शकते. विशेष अधिवेशन बोलावून मराठ्यांना आरक्षण मिळणार? बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
Published on: Feb 13, 2024 12:59 PM
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
