मुख्यमंत्री शिंदे यांच्या घरापासूनच सुरूवात, तर महाराष्ट्रातील चित्र काय? राष्ट्रवादी नेत्याची खरमरीत टीका
आता शिंदे गट आणि भाजपमध्येच बिनसल्याचं पहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावरूनच मिठाचा खडा युतीत पडल्याचं बोललं जात आहे. त्याचदरम्यान आता सोलापुरातील माढा येथील शिवसेना संपर्कप्रमुखाने सुद्धा भाजप आप्यावर अन्याय करत असल्याचं म्हटलं आहे.
जळगाव : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर महायुतीत अलबेल असल्याची टीका केली जात होती. मात्र आता शिंदे गट आणि भाजपमध्येच बिनसल्याचं पहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावरूनच मिठाचा खडा युतीत पडल्याचं बोललं जात आहे. त्याचदरम्यान आता सोलापुरातील माढा येथील शिवसेना संपर्कप्रमुखाने सुद्धा भाजप आप्यावर अन्याय करत असल्याचं म्हटलं आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस नेते आमदार एकनाथ खडसे यांनी भाजप आणि शिंदे गटावर खरमरीत टीका केली आहे. त्यांनी भाजप आणि शिंदे गटात एवढे मतभेद आहेत ज्याची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरापासूनच झाली आहे. तर महाराष्ट्रातील चित्र काय असेल याचा अंदाज येतो, अशी टीका केलीय. शिंदे गट व भाजप या दोघांमधले मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत. कल्याणमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये श्रीकांत शिंदे त्यांच्यावर फार मोठ्या प्रमाणावर आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांनी व्यथित होऊनच आपण राजीनामा देण्याच्या तयारीत आहे अशी उद्विग्न प्रतिक्रिया श्रीकांत शिंदेनी दिलीय. खासदारांच्या राजीनाम्यापर्यंत हा विषय येतो त्यावेळेस परिस्थिती काही नीट आहे असे वाटतं नाहीही असे खडसे म्हणाले.
नोटांचा ढीग,आमदाराचा कॉल..दानवेंनी पोस्टनं खळबळ, VIDEOमध्ये नेमकं काय?
डुकरांना सरकारच मारतंय, दिसताक्षणी... अहिल्यानगरात भयंकर घडतंय, पण का?
दानवेंच्या कॅश बॉम्बवरून दोन्ही सेनेत जुंपली, VIDEO मधला आमदार कोण?
ते स्वतःच्या पक्षाचा अवमान करताय, ठाकरेंच्या दाव्यावर भाजपकडून उत्तर

