“मस्ताने म्हणा किंवा दिवाने म्हणा, पण तुम्हाला वेड असू नये,” राऊत यांच्या टीकेवर कोणाची टोलेबाजी?
‘दो मस्ताने चले जिंदगी बनाने, चुना लगा के पुरा देश डुबाने’. तर हे दोन मस्ताने जसे दिल्लीत आहेत, तसे महाराष्ट्रातही आहेत. ते महाराष्ट्र आणि मुंबईला लुटतायत अशी टीका राऊत यांनी केली होती.
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चारोळी म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. त्यांनी, ‘दो मस्ताने चले जिंदगी बनाने, चुना लगा के पुरा देश डुबाने’. तर हे दोन मस्ताने जसे दिल्लीत आहेत, तसे महाराष्ट्रातही आहेत. ते महाराष्ट्र आणि मुंबईला लुटतायत अशी टीका केली. त्यावर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. त्यांनी, मस्ताने म्हणा किंवा दिवाने म्हणा, पण मुख्यमंत्र्यामध्ये महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं वेड असावं लागतं. घरात बसण्याचं वेड असू नये, असं म्हटलं आहे. तर शिंदे-फडणवीस काम करतायत, कामं सुरू आहेत, हीच खरी आमच्या कामाची पावती आहे, असंही शिरसाट म्हणाले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

