AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pratap Sarnaik : हिंमत असेल मोर्चात सहभागी होणाऱ्या प्रताप सरनाईकांना अटक करुन दाखवा; शिंदेंच्या बड्या मंत्र्यांचं सरकारलं चॅलेंज

Pratap Sarnaik : हिंमत असेल मोर्चात सहभागी होणाऱ्या प्रताप सरनाईकांना अटक करुन दाखवा; शिंदेंच्या बड्या मंत्र्यांचं सरकारलं चॅलेंज

| Updated on: Jul 08, 2025 | 12:21 PM
Share

मनसेच्या मोर्चाला आता नवे वळण लागण्याची शक्यता आहे. शिंदेंचे मंत्री प्रताप सरनाईक हे देखील आता मनसेच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेने (मनसे) च्या मीरा-भाईंदरमधील नियोजित मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परिसरात कलम 144 लागू केले आहे. मनसेच्या शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सर्व कार्यकर्त्यांना अंतिम इशारा देण्यात आला आहे. पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमू नयेत, याची खबरदारी पोलिस प्रशासन घेत आहे. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. दरम्यान, या मोर्चाला आता नवे वळण मिळाले आहे. महायुती सरकारमधील मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्याच सरकारवर टीका करत पोलिसांच्या कारवाईला दडपशाही ठरवले आहे. सरनाईक यांनी स्वतः मोर्चात सहभागी होण्यासाठी निघाल्याचे जाहीर केले आहे. पोलिसांमध्ये हिंमत असेल तर मला अडवून दाखवावे, असे थेट आव्हान त्यांनी राज्य सरकारला दिले आहे.

यावर बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, मराठी भाषिकांनी जर शांतता मार्गाने मोर्चासाठी परवानगी मागितली होती तर ती त्यांना द्यायला हवी होती. जी दादागिरी आणि गुंडगिरी पोलिसांनी कालपासून सुरु केलेली आहे, ही दादागिरी त्या भागाचा आमदार म्हणून प्रताप सरनाईक कधीही सहन करणार नाही. आज सकाळपासून मीरा भाईंदरच्या पोलिसांनी ज्या काही मराठी लोकांची धरपकड सुरु केली आहे, त्याचा मी निषेध व्यक्त करतो. मुख्यमंत्र्यांकडेही निषेध व्यक्त करतो आणि आता मी स्वत: मीरा भाईंदरच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी निघालो आहे, जर पोलिसांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी प्रताप सरनाईकांना अटक करुन दाखवावी, असं थेट आव्हानच आता सरनाईक यांनी दिलं आहे.

Published on: Jul 08, 2025 12:21 PM