Shivsena : भाजपनं आमचं कंबरडं मोडलं… शहाजी बापूंचा भाजपवर गंभीर आरोप अन् शिंदे म्हणाले, बापू अकेला नहीं, मै भी..
शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपने आपले कंबरडं मोडल्याचा आणि सांगोल्यात विरोधात काम केल्याचा त्यांचा दावा आहे. एकनाथ शिंदे यांनीही बापू पाटलांना पाठिंबा दर्शवल्याने सांगोल्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी निर्माण झालेल्या या स्थितीने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
सांगोल्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) गंभीर आरोप केले आहेत. भाजपने आपले कंबरडं मोडल्याचा आणि विधानसभेतही विरोधात काम केल्याचा दावा शहाजी बापू पाटील यांनी केला आहे. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे यांनीही बापू पाटलांना पाठिंबा दर्शवत “मी त्यांच्यासोबत आहे” असे म्हटले आहे, ज्यामुळे या आरोपांना अधिक वजन प्राप्त झाले आहे. शहाजी बापू पाटील यांच्या मते, निवडणुकीपूर्वीच त्यांना भाजपच्या विरोधाची कल्पना होती, तरीही त्यांनी संयम बाळगला.
गुवाहाटीमध्ये भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतरही सांगोल्याच्या विकासाची स्वप्ने पाहणारे बापू पाटील आता भाजपच्या भूमिकेने व्यथित झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यामध्ये शिंदेंची शिवसेना विरुद्ध शेकाप, भाजप, अजित पवार गट आणि काँग्रेससह इतर लहान पक्षांची आघाडी असे चित्र आहे. यातून भाजपसह चार पक्ष शहाजी बापूंच्या विरोधात एकवटले असल्याचे समोर आले आहे. भाजप मित्रपक्ष असतानाही तोडण्याची भूमिका का घेत आहे, असा सवाल बापू पाटलांनी उपस्थित केला आहे.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप

