ठाकरे नाव फक्त बाळासाहेब आणि राज यांनाच शोभतं, तुम्हाला नाही; शिवसेना नेत्याची आदित्य ठाकरेंवर टीका
बाळासाहेब ठाकरे हे एकदा शब्द सोडला की तो बाणासारखा सुटायचा. ते कधी मागे घेत नव्हते. शब्दासाठी पक्की असलेली व्यक्ती अशी त्यांची ओळख होती. पण त्यांचा नातू एवढ्या लेव्हलला जाऊन खोटं बोलू शकेल असा कधी विचारही केला नव्हता
मुंबई : शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे शिंदे गट (Shinde Group) चांगलाच आक्रमक झाला आहे. यावरून शिंदे गटातील नेत्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका करण्यास सुरूवात केली आहे. यावरूनच शिवसेना नेते किरण पावसकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी ठाकरे हे अडनाव लावू नये, त्यांनी आता आदित्य धोडपकर असे नाव लावावं असे म्हटलं आहे. तर बाळासाहेब ठाकरे हे एकदा शब्द सोडला की तो बाणासारखा सुटायचा. ते कधी मागे घेत नव्हते. शब्दासाठी पक्की असलेली व्यक्ती अशी त्यांची ओळख होती. पण त्यांचा नातू एवढ्या लेव्हलला जाऊन खोटं बोलू शकेल असा कधी विचारही केला नव्हता, म्हणून आदित्य ठाकरे यांनी आता ठाकरे न लावता आदित्य धोडपकर लावा. ठाकरे आडनाव फक्त बाळासाहेबांना आणि राज ठाकरेंना शोभतोय तुम्हालाही शोभत नाहीये की जुना आडनाव आहे ते पूर्ण वापरायला सुरुवात करा अशा टीका केली आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

