MLA Disqualification Case : तारीख पे तारीख… शिवसेना-राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर पुढील सुनावणी कधी?
VIDEO | शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदारांसदर्भातील अपात्रता प्रकरणावरील सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात झाली. दरम्यान, आजच्या सुनावणीमध्ये न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले, या प्रकरणावर पुढील सुनावणी ३० ऑक्टोबरला होणार असल्याचे म्हटले.
नवी दिल्ली, १७ ऑक्टोबर २०२३ | शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदारांसदर्भातील अपात्रता प्रकरणावरील सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात पूर्ण झाली. दरम्यान, आजच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. तर या प्रकरणावरील पुढील सुनावणी आता ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे. ३० ऑक्टोबर रोजी सुधारित वेळापत्रक न्यायालयासमोर मांडण्याची कोर्टाकडून सुधारीत वेळापत्रकासाठी शेवटची संधी असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तुम्ही दिलेल्या वेळापत्रकावरून आम्ही समाधानी नाहीत. त्यामुळे आता आम्ही तुम्हाला शेवटची संधी देत आहोत, ३० ऑक्टोबरला सुधारित वेळापत्रक न्यायालयासमोर मांडा, असे न्यायालयाने म्हटले आहे. आज पार पडलेल्या सुनावणीवेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह ठाकरे गटाते नेते अनिल देसाई आणि अनिल परब हे नेते हजर होते.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

