Sanjay Shirsat यांनी काढली संजय राऊत यांची लायकी; म्हणाले, लायकी नसलेले लोकं…
VIDEO | कोणीतरी ऐरागैरा उठतो आणि फडणवीसांची लायकी काढतो, असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी हल्लाबोल करत सडकून टीका केली होती. यावर संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बघा काय दिली प्रतिक्रिया..
मुंबई, ९ ऑक्टोबर २०२३ | कपॅसिटी नसलेल्यांच्या हाताखाली देवेंद्र फडणवीसांना हरकाम्या करून ‘लायकी’ काढली हे बरे नाही, असे म्हणत थेट सामनातून हल्लाबोल केलाय. कोणीतरी ऐरागैरा उठतो आणि फडणवीसांची लायकी काढतो. त्यावर आता संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मला संजय राऊत जर ऐरागैरा म्हणत असतील तर मी आहे पण दलाल नाहीये. संजय राऊत दलाल आहेत. त्यानी आपल तोंड बंद ठेवावं. मी जर बोलायला लागलो तर यांचे कपडे उतरतील. विश्वप्रवक्ते प्रत्येक पक्षाची दलाली करतात. मी दलाल नाही. देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत आम्ही आमचं बघून घेऊ या दलालाने मध्ये बोलू नये, असे म्हणत शिरसाट यांनी राऊत यांच्यावर टीका केली. पुढे शिरसाट असेही म्हणाले, आम्हाला आमच्या नेत्यांबद्दल काय वाटतं ते आम्ही ठरवू, त्यांनी आम्हाला सांगू नये. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षलाही हे सल्ला देतील. ज्या मोदीजींच्या नेतृत्वाला जगाने स्वीकारलं त्यावर यांनी का बोलावं? असा सवाल करत लायकी नसलेले लोकं अशी वक्तव्ये करतात असं शिरसाट म्हणाले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

