बाळासाहेबांच्या पश्चात कलानगरचं ‘कल्लानगर’ झालं, शिवसेना नेत्यांचा संजय राऊत यांच्यासह ठाकरे यांना टोला
कलानगरनेचं म्हणजे आमच्या वंदनीय बाळासाहेबांनीच आम्हाला सर्वकाही दिलंय. पण, बाळासाहेबांच्या पश्चात कलानगराचं ज्यांनी कल्लानगर केलं त्यांना स्वकर्तृत्व आहे का? ज्यांना केवळ घेणंच माहित आहे ते दुसऱ्याला देणार काय? असा थेट सवाल करत नरेश म्हस्के यांनी राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला
मुंबई, २१ नोव्हेंबर २०२३ : बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात कलानगरचं कल्लानगर झालं असल्याची सडकून टीका शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे. तर संजय राऊत यांनी शिवसेनेसाठी काय केलं? असा सवालही नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांना केला. म्हस्के म्हणाले, कलानगरनेचं म्हणजे आमच्या वंदनीय बाळासाहेबांनीच आम्हाला सर्वकाही दिलंय. पण, बाळासाहेबांच्या पश्चात कलानगराचं ज्यांनी कल्लानगर केलं त्यांना स्वकर्तृत्व आहे का? ज्यांना केवळ घेणंच माहित आहे ते दुसऱ्याला देणार काय? असा थेट सवाल करत त्यांनी राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला. तर तुम्ही पक्षासाठी केलं? असा सवाल करत तुम्हाला काहीच बोलण्याचा अधिकार नाही, असेही म्हणत नरेश म्हस्के यांनी हल्लाबोल केला.
Latest Videos
Latest News