Bhaskar Jadhav | ज्यांच्या खांद्यावर मान ठेवली त्यांनी केसाने गळा कापला – भास्कर जाधव
शिवसेना हा प्रखर हिंदुत्ववादी पक्ष आहे. कुणीही या निखाऱ्यात हात टाकण्याचा प्रयत्न करू नये. प्रयत्न करणाऱ्यांच्या राजकीय जीवनाची राख होईल.
रत्नागिरी : संभाजी ब्रिगेडप्रमाणे महाराष्ट्रातील इतर पक्षांसोबत शिवसेनेने युती करायला हवी. विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाने आजवर अनेकांशी युती केली आणि दगा दिला. शिवसेना मात्र एकसोबत कायम राहिली. ज्याच्या खांद्यावर मान ठेवली त्यांनी केसाने गळा कापला. शिवसेनेने आधीच मित्रपक्ष वाढवले असते तर आज भाजपने केलेल्या विश्वासघाताच दुःख वाटलं नसतं. शिवसेना देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे. 56 दसरा मेळावा घेण्याचा विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद असलेला एक चिन्ह एक झेंडा असलेला पक्ष आहे. शिवसेना हा प्रखर हिंदुत्ववादी पक्ष आहे. कुणीही या निखाऱ्यात हात टाकण्याचा प्रयत्न करू नये. प्रयत्न करणाऱ्यांच्या राजकीय जीवनाची राख होईल. शिवसेनेच्या नादाला लागू नका, अशी टीका शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी केली.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
