आम्ही गांधीवादी नाही, जशाच तसं उत्तर देऊ; भाजपच्या नेत्याने राऊतांना खडसावले

आम्ही गांधीवादी नाही, जशाच तसं उत्तर देऊ; भाजपच्या नेत्याने राऊतांना खडसावले

aslam shanedivan | Updated on: Mar 29, 2023 | 2:20 PM

राणे यांनी राऊत यांच्यावर टीका करताना, पातळी सोडण्याची सुरुवात संजय राऊतांनी केल्याचे म्हटलं आहे. राऊत यांच्या जिभेला तर हाड नाही

बीड : राज्यात शिवसेनेत दोन गट पडले आणि राजकारणात पातळी सोडून टीका टिपणी होऊ लागल्याचे दिसत आहे. आरोप-प्रत्यारोप करताना महिलांवर देखील निशाना साधला जात आहे. शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर अशीच खालच्या पातळीवर जात टीका केली. त्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाना साधला आहे. तसेच राजकारणातील अशी स्थिती ही संजय राऊत यांच्यामुळे झाल्याचेही ते म्हणाले. ते केजमध्ये कोर्टामध्ये हजेरी लावण्यासाठी आले असता बोलत होते.

राणे यांनी राऊत यांच्यावर टीका करताना, पातळी सोडण्याची सुरुवात संजय राऊतांनी केल्याचे म्हटलं आहे. राऊत यांच्या जिभेला तर हाड नाही. पण त्यांनी जर पातळी ठेवली असती ॲक्शनला रिएक्शन आली नसती. कोण काय ऐकून घ्यायला बसलेलं नाही. ते काहीही बोलले, कुठल्याही भाषेत बोलले तर ते आम्ही ऐकून घ्यायचं का? एवढं काय आम्ही गांधीवादी नाही. ते काय आमच्या रक्तात नाही. ज्या भाषेत समोरचा बोलतो त्याच भाषेतच उत्तर दिलं गेलं पाहिजे हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवलंय हे संजय राऊत ने लक्षात ठेवावं.

Published on: Mar 29, 2023 2:20 PM
Follow Us