मंत्र्यांना खाली उतरवून श्रीकांत शिंदे यांनी आदिवासी मुलांना घडवली हेलिकॉप्टरची सफर
सातपुड्याच्या दुर्गम भागात सभा असल्याने खासदार श्रीकांत शिंदे आणि मंत्री सभेच्या ठिकाणी दाखल झालेत. मात्र अदिवासी भागात हेलिकॉप्टर आल्याने ते पाहण्यासाठी चिमुकल्यांनी एकच गर्दी करत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हेलिकॉप्टर भोवती गलका केला.
नंदुरबार, २२ फेब्रुवारी २०२४ : सातपुड्याच्या दुर्गम भागात दौऱ्यावर असलेल्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदिवासी मुलांना हेलिकॉप्टरची सफर घडवली आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागात सभा असल्याने खासदार श्रीकांत शिंदे आणि मंत्री सभेच्या ठिकाणी दाखल झालेत. मात्र अदिवासी भागात हेलिकॉप्टर आल्याने ते पाहण्यासाठी चिमुकल्यांनी एकच गर्दी करत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हेलिकॉप्टर भोवती गलका केला. यावेळी कुतूहलाने हेलिकॉप्टरकडे पाहणाऱ्या मुलांकडे खासदार श्रीकांत शिंदे यांचं लक्ष गेलं आणि त्यांनी आपल्या अंगरक्षकांना त्या चिमुकल्या मुलांना आपल्याकडे आणण्यास सांगितलं. मंत्री दादा भुसे आणि उदय सामंत यांना खाली उतरण्यास सांगितले आणि या मुलांना हेलिकॉप्टरमध्ये बसवून त्यांना हेलिकॉप्टरची सफार घडवली.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?

