Sanjay Shirsat : शिवसेनेच्या मंत्र्याला इन्कम टॅक्सची नोटीस अन् शिंदे थेट तडकाफडकी दिल्लीत, कोणा-कोणाची घेतली भेट?
एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांना आयकरच्या नोटीस यायला सुरुवात झाली आहे. मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे दिल्लीला गेले. शिंदेनी भाजपचे बडे नेते आणि काही वकिलांच्या देखील भेटीगाठी घेतल्याची माहिती आहे.
शिंदे यांचे मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस आली. आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे रात्रीच दिल्लीत तडकाफडकी गेले. शिंदे दिल्लीत भाजपच्या बड्या नेत्यांना भेटल्याची माहिती आहे. अधिवेशन सुरू असताना अचानक शिंदे दिल्लीत का गेले? यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. पण शिंदे यांच्या भेटीचं कारण मंत्र्यांना आलेला इन्कम टॅक्सची नोटीस आहे की काय? यावरूनही विधानभवनात खलबतं सुरू झाली. अशातच रात्रीच दिल्लीत बड्या नेत्यांची भेट घेऊन शिंदे मुंबईत परतले. तर सरकारमध्ये गँगवार सुरू झाल्याची टीका काँग्रेसच्या नाना पटोलेंनी केली. तर मंत्री शिरसाट यांनी आपल्याला नोटीस आलेली आहे हे ऑन कॅमेरा सांगितलं. पण त्याच वेळी श्रीकांत शिंदे यांचाही उल्लेख करण्यात आला होता. पण श्रीकांत शिंदे यांना आयकरची नोटीस आली आहे की नाही हे माहीत नाही, असं शिरसाट म्हणाले. मंत्री शिरसाट यांना आयकरची नोटीस येणारच होती. समाजकल्याण मंत्र्यांनी स्वतःचच नाही तर समाजाचही कल्याण कराव असं टोला ठाकरे गटाच्या शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांनी लगावला.
सरपंच हत्येप्रकरणी मोठी अपडेट आल्यानंतर धनंजय देशमुख यांची मागणी काय?
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा

