Santosh Bangar : शिंदेंच्या नेत्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग, संतोष बांगर मतदान केंद्रावर पोहोचले अन्… हिंगोलीत काय घडलं?
हिंगोलीतून संतोष बांगर यांच्यावर मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप आहे. त्यांनी मतदान केंद्रात घोषणाबाजी केली आणि एका महिलेला मतदान करताना सूचना केल्या.
हिंगोलीत संतोष बांगर यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग झाल्याचा प्रकार समोर आला. शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संतोष बांगर यांनी मतदान केंद्रातच घोषणाबाजी केली आणि एका महिलेला बटन दाबताना सूचना दिल्याचे दिसून आले. तर दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यातच EVM बिघाडामुळे मतदान प्रक्रिया काही काळ स्थगित करण्यात आली होती. शहरातील गणेशवाडी येथील EVM मशीन बंद पडले होते. mock poll च्या वेळेस हिंगोली शहरातील रिसाला बाजारातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशवाडी येथील वार्ड क्रमांक दोनमधील मशीन बंद होती. मशीनचे बटन दाबले जात नसल्याने ती बदलण्यात आल्याचे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मशीन बदलल्यानंतर या वॉर्डात मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली आणि कोणत्याही आक्षेपाची नोंद झाली नाही, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नमूद केले.
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन

