‘माझा नेता 2024 ला आमदार होऊ दे…’; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
आज सकाळी लालबागचा राजाच्या चरणी एक चिठ्ठी अर्पण करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून 2024 चा शिवडी विधानसभा आमदार सुधीर भाऊ साळवी चिठीमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. आज पहाटे सुधीर साळवी समर्थकांकडून राजाच्या चरणी चिठ्ठी ठेवण्यात आली.
लालबागच्या राजाच्या निरोपाची मिरवणूक सुरू झाली आहे. मात्र राजाच्या निरोपापूर्वीही लागबागच्या राजाची शेवटची झलक अन् दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यावेळी एक चिठ्ठी राजाच्या पायाशी ठेवण्यात आली. यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवडी विधानसभा 2024… आमदार सुधीर ( भाऊ) साळवी, असा मजकूर लिहिण्यात आला आहे. तर ही चिठ्ठी लालबागचा राजाच्या चरणी अर्पण करण्यात आली आहे. ही चिठ्ठी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे आता आगामी काळात सुधीर साळवी यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळते का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.
शिवडी विधानसभेमध्ये सध्या अजय चौधरी ठाकरे गटाकडून आमदार आहेत. अजय चौधरी यांच्यासोबतच सुधीर साळवी देखील शिवडी विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे आता अजय चौधरी की सुधीर साळवी कोणाला दिली संधी दिली जाणार, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. सुधीर साळवी हे शिवसेना ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते आहेत. सुधीर साळवी हे शिवडी विधानसभा संघटक, दक्षिण मुंबई लोकसभा समन्वयक म्हणून ठाकरे गटाकडून काम करत आहेत. तर लालबागचा राजाचे मानद सचिव देखील सुधीर साळवी आहेत. आता आगामी विधानसभा निवडणुकीत शिवडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, यासाठी ते इच्छुक आहेत.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात

