रोशनी शिंदे प्रकरणावरून आव्हाडांचा शिंदे, फडणवीस सरकारला इशारा; मी, त्यांच्या पाठिशी
राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर निशाना साधला आहे. तसेच शिंदे, फडणवीस इशारा देत जे विद्रोही आहेत, परिस्थितीविरोधात उभे राहून झगडत आहे, त्यांची कुठलीही लढाई असो त्यांच्या पाठिशी उभं राहणार असल्याचं आव्हाड यांनी म्हटलं आहे
मुंबई : ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना मारहाण करण्यात आली होती. यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापलेलं आहे. यावरूनच राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर निशाना साधला आहे. तसेच शिंदे, फडणवीस इशारा देत जे विद्रोही आहेत, परिस्थितीविरोधात उभे राहून झगडत आहे, त्यांची कुठलीही लढाई असो त्यांच्या पाठिशी उभं राहणार असल्याचं आव्हाड यांनी म्हटलं आहे. यावेळी आव्हाड यांनी तुम्ही, एतकंच स्वच्छ असता तर रोशनी शिंदे यांना मारहान केली नसती. ते ही ती आई होण्याच्या मार्गावर असताना. तिला आई होण्यापासून रोखणे योग्य आहे का? असा सवाल ही त्यांनी केला. तर पत्रकारांना दम दिला जातोय. स्मिता आंग्रेला दम दिला गेला. हे योग्य आहे का? आज जर नामदेव ढसाळ असते तर त्यांना तुरुंगात टाकले असते. हे सर्व बंडखोर आहेत, परिस्थिती मानसाला बंडखोर करते मग तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार का? असा घणाघात केला आहे.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?

