मोठी बातमी! जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल, मारहाण आणि कथित ऑडिओ क्लिप; नेमकं प्रकरण काय?

ठाणे महापालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमधून जितेंद्र आव्हाड यांची कन्या आणि जावयाला जीवे मारण्याची कथित धमकी देण्यात आली आहे.

मोठी बातमी! जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल, मारहाण आणि कथित ऑडिओ क्लिप; नेमकं प्रकरण काय?
jitendra awhadImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 16, 2023 | 7:07 AM

निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, ठाणे: ठाण्याचे प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरुद्ध नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भादंवि कलम 353, 307, 332, 506(2), 143, 148, 149, 120 (ब)सह आव्हाडांसह सात जणांविरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. नगरपालिका अधिनियम 3/25, 4/25 अन्वये एफआयआर (क्रमांक 60/2023) नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे आव्हाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तसेच आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादीचे नेते असून माजी मंत्री आहेत. बुधवारी सायंकाळी 6.45 वाजता अभिजीत पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर व अन्य तिघांनी महेश आहेर यांच्यावर महापालिकेच्या गेटवर हल्ला केला. महेश आहेर यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिजीत पवार हे जितेंद्र आव्हाड यांचे खाजगी सचिव आहेत. आव्हाड यांच्या सांगण्यावरूनच हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहेर यांनी केला आहे. त्यामुळे आव्हाड यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

मारहाण का झाली?

ठाणे महापालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमधून जितेंद्र आव्हाड यांची कन्या आणि जावयाला जीवे मारण्याची कथित धमकी देण्यात आली आहे. आहेर यांचीच ही धमकीची क्लिप असल्याचं सांगत आव्हाड समर्थकांनी आहेर यांना चोप दिला. त्यामुळे आहेर यांनी नौपाडा पोलिसात धाव घेतली होती.

ऑडिओ क्लिपमध्ये काय?

आव्हाड माझा विरोधात कधीही काहीही करेल. मला यांनी त्रास दिला तर मी काहीही करेन. मी बाबाजीला सांगून आमचे शूटर स्पेनला लावले आहेत. स्पेनमधील नातशाचा पत्ता शोधायला. त्याचा जावई ठाण्यात नाही आला तर त्याच्या बापावर एक अटॅक केल्यावर तो येईल एका दिवसात. मी एअरपोर्टपासून फिल्डिंग लावली आहे. तो असा नाही आला तर त्याच्या एरियाचा पत्ता शोधून ठेवला आहे. स्पेन एवढं मोठं नाही.

विकास कॉम्प्लेक्सचा पत्ता आहे. त्याच्या आई वडिलांच्या सोबत एक कांड केलं तर तो आई बाबांच्या ओढीने लगेच येईल. मी एअरपोर्ट पासून फिल्डिंग लावली आहे. त्याचा गेम करणार. त्याच्या मुलीला रडायला लावणार म्हणजे त्याला कळणार मुलीच दुःख काय असतं, असं या ऑडिओ क्लिपमध्ये एकजण बोलताना दिसत आहे.

मी टोकाची भूमिका घेतली नाही. प्लानिंग केलं आहे. तो साप आहे. सत्तेत आल्यानंतर मला काहीही करेल. त्यांनी माझ्याबद्दल काही बरं वाईट केलं तर मीही प्लान केला आहे. हा मला जीवे मारू शकतो. त्यामुळे मी देखील प्लानिंग करून ठेवले आहे.

त्याला देखील कळले पाहिजे महेश कधीही स्पॉट होऊ शकतो. आपली फॅमिली उद्ध्वस्त होऊ शकते. मुलीला काहीही होऊ शकते. तेव्हा तो आटोक्यात येऊ शकतो. तेव्हा तो शांत होईल. मला ठेचायचा आहे त्याला. माझ्या माणसाला विचारा सुटकेस भरून बाबाजीकडून पैसे येतात. बाबाजी माझ्यासाठी लीगल प्रॉपर्टीचे काम करतो, असा दावाही या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं आहे.

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.