AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : जितेंद्र आव्हाड समर्थकांकडून सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या समर्थकांकडून सहाय्यक आयुक्त महेश आहेर (Mahesh Aher) यांना मारहाण करण्यात आलीय.

VIDEO : जितेंद्र आव्हाड समर्थकांकडून सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण
जितेंद्र आव्हाडImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 15, 2023 | 8:09 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या समर्थकांकडून सहाय्यक आयुक्त महेश आहेर (Mahesh Aher) यांना मारहाण करण्यात आलीय. महेश आहेर यांच्यावर आव्हाड यांच्या कुटुंबियांना धमकवण्याचा आरोप आहे. महेश आहेर यांची कथित क्लिप सुद्धा व्हायरल झाल्याचा दावा केला जातोय. आव्हाडांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमकीची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय. ही क्लिप आहेर यांची असल्याचा दावा केला जातोय. त्यातूनच आव्हाड समर्थकांकडून आहेर यांना मारहाण करण्यात आलीय.

“तो स्वत:च्या तोंडाने कबूल करतोय”, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली. “एक गोष्ट मी टीव्हीवर माझ्या कुटुंबियांबद्दल पाहिली की, माझ्या मुलीला स्पेनमध्ये मारणार आहेत. त्यासाठी बाबाजी नावाचा शूटर असणार, असं तो क्लिपमध्ये बोलतोय”, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

“तो एकदम डॉनसारखं बोलतोय. माझ्यासाठी बाबाजी काहीही करु शकतात. मी दिवसाला 40 लाख कमावतो. आणि 20 लाख रुपये वाटतो, असं तो क्लिपमध्ये बोलतोय”, असं जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं.

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?

“मला सकाळी माझ्या एका मित्राने ही ऑडिओ क्लिप आणून दिली. त्यामध्ये काही धक्कादायक बाबी आहेत. माझ्या मुलीपर्यंत किंवा जावयापर्यंत? पण माझ्या कुटुंबियांवर गोळ्या झाडणारा माणूस अजून या जगात पैदा व्हायचा आहे. त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे मी 40 लाख दिवसाला जमा करतो, 20 लाख वाटतो, आणि सारखं त्याने बाबाजी आणि शूटर्सचं नाव घेतलंय”, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“माझ्या अंदाजाने जी माहिती मुंबईची आहे, मुंबईचा गँगवार जवळून बघितलेला मी माणूस आहे. हा बाबाजी म्हणजे सुभाष सिंग ठाकूर आहे. जो जे जे हत्याकांडातला एक आरोपी होता”, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.

“बाबाजीच्या नावावर खूप गुन्हे आहेत. तसा तो कुप्रसिद्ध आहे. त्याच्या जीवावर हे सगळं शूटर्सचं प्लॅनिंग करतोय, हे तो बोलून दाखवतोय. नंतर म्हणतोय मी बाबाजींचं काम करणार आहे. हे सगळं जे काही चालू आहे त्याला लगाम घातला गेला नाही तर गैरकृत्यातून जमवलेली पैशांची थैली त्याने डोकं जड व्हायला लागतं. स्पेनमध्ये शूटर तयार ठेवलेत हे काय बोलणं झालं काय?”, असा सवाल त्यांनी केला.

“एवढी हिंमत सगळं खोटी सर्टिफिकेट्स देऊन मॅनेज करुन अधिकारी झालेला व्यक्ती करतो कसा? त्याने संपूर्ण म्हाडामध्ये पाहिजे तशी 100 घरे दिली आहेत. आजपर्यंत आम्ही बोलत नव्हतो. पण आता अती व्हायला लागलं आहे. मला कालच्या ट्विटमुळेच हे संभाषण मिळालं आहे”, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.