AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saamana : मुंबईत काँग्रेसचा स्वबळाचा नारा अन् 'सामना'तून सबुरीचा सल्ला, बिहार निकालाचा दाखला देत घेरलं

Saamana : मुंबईत काँग्रेसचा स्वबळाचा नारा अन् ‘सामना’तून सबुरीचा सल्ला, बिहार निकालाचा दाखला देत घेरलं

| Updated on: Nov 18, 2025 | 1:04 PM
Share

सामनातून काँग्रेसला संयमाचा सल्ला देत मराठी पक्षांना एकजुटीचा संदेश दिला आहे. मुंबईत काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यानंतर बघा सामनातून नेमकं काय म्हटलं?

सामना वृत्तपत्रातून काँग्रेसवर निशाणा साधत त्यांना सबुरीचा सल्ला देण्यात आला आहे. बिहारमध्ये राज ठाकरे किंवा शिवसेना नसतानाही काँग्रेसचा पराभव झाल्याचे उदाहरण देत, मुंबईकर काँग्रेसवाल्यांचे यावर काय म्हणणे आहे, असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे. काँग्रेसने मुंबईत स्वबळाचा नारा दिल्यावर सामनाने पळत्याच्या मागे लागून उपयोग नाही असे म्हटले आहे. काँग्रेसला मुंबईमध्ये भाजप आणि त्यांच्या अदानी संस्कृतीचा पराभव करायचा आहे की नाही, असा प्रश्नही सामनाने विचारला.

तसेच, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील जवळीक वाढल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरण्याचे कारण नसल्याचे सामनाने स्पष्ट केले. लोकसभा आणि विधानसभेला एकोपा दिसला होता, त्यामुळे काँग्रेसने संयम बाळगावा असे आवाहन केले. मराठी बाण्याचे जे पक्ष एकत्र येत आहेत, त्यांची गोळाबेरीज करून मुंबईवर मराठी माणसाचा भगवा कसा फडकेल, याचाच विचार करण्याचे आवाहन सामनाने केले आहे.

Published on: Nov 18, 2025 01:04 PM