उद्धव ठाकरे यांचा सर्वात जवळचा शिलेदार शिंदेंचं शिवधनुष्य हाती घेणार?
ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. कारण रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी आज रात्री रवींद्र वायकर यांचा शिंदे गटात प्रवेश होण्याची शक्यता आहे.
मुंबई, १० मार्च २०२४ : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. ठाकरे गटाचे नेते आमदार रवींद्र वायकर यांचा आज रात्री शिवसेना शिंदे गटात प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. कारण रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी आज रात्री रवींद्र वायकर यांचा शिंदे गटात प्रवेश होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. तर रवींद्र वायकर यांचा आज रात्री आठ वाजेनंतर वर्षा बंगल्यावर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार असून रवींद्र वायकर यांच्या पक्षप्रवेशाची वर्षा बंगल्यावर जोरदार तयारी सुरु झाली आहे, अशीही चर्चा सुरू आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

