हर्षवर्धन सपकाळांच्या पाठोपाठ सचिन अहीर शरद पवारांच्या भेटीला अन् एकाच गाडीतून प्रवास, काय झाली चर्चा?
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन अहीर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या भेटीला आज गेल्याचे पाहायला मिळाले. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले
मुंबईमध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यापाठोपाठ शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन अहीर यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) चे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. आमदार सचिन अहीर आणि शरद पवार यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याचेही पाहायला मिळाले. सचिन अहीर हे शरद पवार यांच्या गाडीत बसून थेट सिल्वर ओकच्या दिशेने रवाना झाल्याचे दिसले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या शरद पवार यांच्यासोबत घेतलेल्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र शरद पवार आणि सचिन अहीर यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्यानंतर या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

