India Pakistan Ceasefire : अरुणाचल प्रदेशात चीनच्या कुरघोड्या सुरुच, नापाक हरकत करताच भारताकडून करारा जवाब
चीनने पुन्हा एकदा भारताविरुद्ध कट रचण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे बदलली आहेत. यानंतर भारताने देखील चांगलंच खडसावलं आहे.
अरूणाचल प्रदेशात चीनच्या पुन्हा कुरघोड्या सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. अरुणाचल प्रदेशातील अनेक ठिकाणांचं चीनकडून नामांतर करण्यात आलं आहे. दरम्यान, चीनकडून करण्यात आलेल्या या कृतीनंतर भारत सरकारने प्रतिक्रिया दिली आहे. चीनची ही कृती हास्यास्पद आणि अर्थहीन असल्याचे भारत सरकारने म्हटले आहे. तर अरूणाचल प्रदेश हा आमचा भाग होता, आहे आणि राहणार असल्याचं भारत सरकारने ठणकावून सांगितलं आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावात, चीनने पुन्हा एकदा एक नापाक हरकत केले आहे. अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे ड्रॅगनने बदलली आहेत. भारताने यावर तीव्र आक्षेप घेतला आणि चीनला चोख प्रत्युत्तर दिलंय. भारत सरकारने म्हटलंय की, नवीन नावे देऊन सत्य बदलणार नाही. अरुणाचल नेहमीच भारताचा अविभाज्य भाग आहे, होता आणि राहील. दरम्यान, चीनने केलेली कुरघोडी ही पहिल्यांदाच नाही तर चीनने यापूर्वीही असेच काही केले आहे. मात्र भारताने प्रत्येक वेळी चोख उत्तर चीनला दिले आहे.
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...

