AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | कारवाई राणांवर…पण इशारा भाजपला?

| Updated on: Apr 24, 2022 | 10:15 PM
Share

मातोश्रीचे तुम्ही रेकी करता. काही हल्ला वगैरे झाला नाही. तो स्वत:च सर्व करवून घेतो. पोलीस आपले काम करतात. मुंबई पोलीस चुकीची कारवाई करत नाहीत, असं सांगतानाच शिवसेना आता अॅक्शन मोडमध्ये आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.

मुंबई : विरोधी पक्ष कायदा व्यवस्था बिघडवण्याचे काम करत आहे. त्यांना लाज वाटायला पाहिजे. आमच्या आंगावर आले तर आम्ही घरात घुसणारचं, असं संजय राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी भाजप नेत्यांनाही फटकारले. मातोश्रीचे तुम्ही रेकी करता. काही हल्ला वगैरे झाला नाही. तो स्वत:च सर्व करवून घेतो. पोलीस आपले काम करतात. मुंबई पोलीस चुकीची कारवाई करत नाहीत, असं सांगतानाच शिवसेना आता अॅक्शन मोडमध्ये आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. तर राज ठाकरे यांचा XXX ( पायजामा) फाटलाय अशी भाषा विजय वडेट्टीवार यांनी वापरली. राणा दाम्पत्याने राज्य-मुंबईची कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत दाम्पत्यासाठी XXX अशा शब्दांचा वापर त्यांनी केला. राणा दाम्पत्याने हनुमान चालीसाचे महत्व आम्हाला सांगू नये अशी टीका त्यांनी केली.