AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manisha Kayande | अधिवेशनात शिवसेना सरकारला घेरणार, मनिषा कायंदे यांचे वक्तव्य

Manisha Kayande | अधिवेशनात शिवसेना सरकारला घेरणार, मनिषा कायंदे यांचे वक्तव्य

| Updated on: Aug 12, 2022 | 6:49 PM
Share

Manisha Kayande | राज्यात महिलांवरील अत्याचाराप्रकरणात शिवसेना राज्य सरकारला घेरणार असल्याचे शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी स्पष्ट केले.

Manisha Kayande | राज्यात महिलांवरील अत्याचाराप्रकरणात शिवसेना राज्य सरकारला घेरणार असल्याचे शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी स्पष्ट केले. राज्यात नागपूर, चंद्रपूर पाठोपाठ इतर अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचाराच्या घटना (violence against women) घडल्या आहेत. या ठिकाणी प्रशासनाची आणि यंत्रणांचा अक्षम्य हलगर्जीपणा दिसून आला. एक आठवडा जिल्हा पोलीस अधिक्षक पद रिक्त असणे ही गोष्ट लाजीरवाणी असल्याचे त्यांनी यावेळी सांगतिले. तसेच सरकारी आरोग्य रुग्णालयांची परिस्थिती अत्यंत वाईट असल्याचे विदारक चित्र त्यांनी यावेळी सांगितले. गेल्या 41 दिवसांपासून राज्यातील घडामोडींवर ही त्यांनी टीका केली. आता या सर्व प्रश्नी राज्य सरकारला धारेवर धरणार असल्याचे त्यांनी सांगितले. पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) आता अवघ्या काही दिवसांवर आले असून विरोधकांनी ही सरकारला कोंडीत पकडण्यासाठी कंबर कसली आहे. शक्ती कायदा (Shakti Law) लवकर व्हावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

Published on: Aug 12, 2022 06:49 PM