महाराष्ट्रात लुच्चे दिन, अन् गुजरातला…… शिवसेनेचा सामनातून शब्दबाण

| Updated on: Oct 29, 2022 | 9:00 AM

भारताने जिंकल्यानंतर एकनाथ शिंदेंनी आम्ही तर तीन महिन्यांपूर्वीच मॅच जिंकल्याची प्रतिक्रिया दिली होती.  तोच धागा पकडत अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात लुच्चे दिन, अन् गुजरातला...... शिवसेनेचा सामनातून शब्दबाण
Image Credit source: social media
Follow us on

मुंबईः एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपची (BJP) युती असलेलं सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रात लुच्चे दिन आले आहेत. तर गुजरातला (Gujrat) अच्छे दिन आले आहेत, असा आरोप शिवसेनेने केला आहे. उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचं (Shivsena) मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून पहिल्याच पानावर लुच्चे असा शब्दप्रयोग करत भाजपच्या ‘अच्छे दिन’ या टॅगलाईनवरून निशाणा साधण्यात आलाय. शिंदे सरकार आल्यापासून महाराष्ट्रातून अनेक महत्त्वाचे प्रकल्प गुजरातला गेले. यावरून सामनातून टीका करण्यात आली आहे.

गुजरातेत लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. तेथील नागरिकांना खूश करण्याचा सपाटाच लावण्यात आला आहे. राज्यातील मोठ्या प्रकल्पांची पळवापळवी सुरु आहे. पण मिंधे सरकार काहीच हालचाल करत नसल्याने आतापर्यंत चार प्रकल्प हातातून निसटले आहेत, असा आरोप शिवसेनेने केलाय.

तर सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर थेट टीका करण्यात आली आहे. पाकिस्तानसोबतचा सामना भारताने जिंकल्यानंतर एकनाथ शिंदेंनी आम्ही तर तीन महिन्यांपूर्वीच मॅच जिंकल्याची प्रतिक्रिया दिली होती.  तोच धागा पकडत अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे.

मिंध्यांनी तीन महिन्यांपूर्वी सामना जिंकल्यामुळेच मुख्यमंत्री एकिकडे 30 लाख शेतकऱ्यांना चार हजार कोटींची मदत दिली असे बुडबुडे सोत आहेत. तर तिकडे उध्वस्त शेतकरी मदत देता का, मदत… असा टाहो फोडत आहेत.. तर राज्याचे कृषीमंत्री जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही दारू घेता का… असा प्रश्न करीत आहेत, अशी जळजळीत टीका शिवसेनेने केली आहे.