Meenatai Thackeray Statue : मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याप्रकरणी पहिली कारवाई, अज्ञात व्यक्तीवर…
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंगफेक झाल्याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम 298 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रार्थना स्थळाला इजा पोहोचवल्याप्रकरणी हा कलम वापरला गेला आहे.
दादर शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने रंग फेकल्याची घटना घडली होती. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात एक महत्त्वाचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनंतर पोलीसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहितेतील कलम 298 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हे कलम प्रार्थना स्थळाला इजा पोहोचवण्याच्या गुन्ह्याशी संबंधित आहे. पोलीस या घटनेचा तपास करीत असून, दोषींना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याची घटना समोर आली आहे. यामुळे पोलिसांना घटनेचा तपास करण्यात अडचणी येत आहेत. पुतळ्याच्या परिसरात एकही सीसीटीव्ही कॅमेरा नाही, यामुळे घटना घडवणाऱ्यांना ओळखणे कठीण झाले आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

