Shivendraraje | पराभवाचं खापर दुसऱ्यावर फोडू नये; शिवेंद्रराजे, शशिकांत शिंदे यांच्यात जुंपली

माझ्यावर खापर फोडून सर्व गोष्टीला शिवेंद्रराजे आणि राष्ट्रवादीची मंडळी जबाबदार आहेत असे शशिकांत शिंदें यानी म्हणू नये. तुमच्या मागे लागायची कोणालाही हौस नाही. वस्तुस्थिती वेगळी आहे, असं शिवेंद्रराजे भोसले म्हणाले.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकी नंतर जावळी तालुक्यातील सोनगाव येथे ज्ञानदेव रांजणे या विजयी उमेदवाराच्या सत्कार सोहळ्यात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना जशास तसे उत्तर दिले आहे.माझ्यावर खापर फोडून सर्व गोष्टीला शिवेंद्रराजे आणि राष्ट्रवादीची मंडळी जबाबदार आहेत असे शशिकांत शिंदें यानी म्हणू नये. तुमच्या मागे लागायची कोणालाही हौस नाही. वस्तुस्थिती वेगळी आहे.धाक दडपशाही दहशत अशा गोष्टींचा काही उपयोग होत नाही. जशास तसे उत्तर देण्याची सर्वांची तयारी आहे. हिशोब चूकता करतो अशी भाषा आमदार शशिकांत शिंदे करत आहेत. तुमची जर तशी तयारी असेल तर आमची ही हिशोब चुकता करायची तयारी असल्याचा इशारा आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI