Beed News : शिवराज दिवटे मारहाण प्रकरण; न्यायाच्या मागणीसाठी बीड-परळी महामार्गावर रास्ता रोको
बीडच्या परळी येथील शिवराज दिवटे या तरुणाला अपहरण करुन जबर मारहाण करण्यात आली. या घटनेचा निषेध व्यक्त करत कारवाईच्या मागणीसाठी परळीतीत नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत.
बीडच्या परळी येथील शिवराज दिवटे या तरुणाला अपहरण करुन जबर मारहाण करण्यात आली. काल घडलेल्या या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा बीडच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेनंतर परळीतील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. आज या घटनेचा निषेध व्यक्त करत कारवाईच्या मागणीसाठी परळीतीत नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत.
दरम्यान, शिवराज दिवटे या तरुणाला मारहाण करतानाचा भयानक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत समाधान मुंडे आणि त्याचे साथीदार शिवराज दिवटे याला बेदम चोप देताना दिसत आहेत. शिवराजला जमिनीवर खाली पाडून चारही बाजूंनी समाधान मुंडे आणि त्याचे साथीदार त्याला मारत आहेत. या सगळ्यांच्या हातात काठ्या आणि बांबू दिसत आहेत. यावेळी शिवराज दिवटे जोरजोरात ओरडत होता. मात्र, तरीही समाधान मुंडे आणि त्याचे साथीदार त्याला मारत राहिले. या मारहाणीत शिवराज गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेचा संताप ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे.
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर

