महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर, शिवसेनेचा माजी मंत्री रेमडेसिव्हीरसाठी आंदोलन करणार

रेमडेसिव्हीरचा पुरवठा नीट होत नसल्यामुळे शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे उद्या सरकारविरोधात आंदोलन करणार आहेत. Vijay Shivtare

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:36 PM, 18 Apr 2021

पुणे: रेमडेसिव्हीरचा पुरवठा नीट होत नसल्यामुळे शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे उद्या सरकारविरोधात आंदोलन करणार आहेत. रेमडेसिव्हीरच्या पुरवठ्यात पुरंदर तालुक्याला डावललं जात असल्याचा आरोप विजय शिवतारे यांनी केला आहे. रेमडेसिव्हीरचा पुरवठा सुरळीत व्हावा यामागणीसाठी विजय शिवतारे उद्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करणार आहेत. विजय शिवतारे हे पुरंदरचे शिवसेनेचे माजी आमदार असून माजी मंत्री आहेत.